वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
यंदा वषी चांगला मान्सून बरसल्याने देशभरातील शेतीकामांना मोठय़ा प्रमाणात वेग आला आहे. शेतातील पिकांचीही जोमाने वाढ होत असल्याकारणाने शेतकरी वर्ग आनंदी दिसून येत आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये विक्रीत 70 टक्के इतकी वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
शेती कामांसाठी शेतकरी वर्ग ट्रक्टरचा वापर मोठय़ा प्रमाणात करू लागले आहेत. याच्या माध्यमातून शेती करणे त्यांना अधिक सोपे जाते. गेल्या ऑगस्टमध्ये ट्रक्टर विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. अर्थात काही कंपन्यांच्या विक्रीची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. मागच्या वषीच्या तुलनेत यंदा वषी ऑगस्टमध्ये 70 टक्के इतकी विक्रीत वाढ झाली असल्याचा अंदाज ट्रक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनने वर्तवला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये 37 हजार 50 इतक्मया ट्रक्टर्सची विक्री झाली होती. यंदा एस्कॉर्ट आणि महिंद्रा या दोन कंपनीने विक्रीत चांगली कामगिरी नोंदवली असल्याचे समजते. महिंद्रा आणि महिंद्राच्या ट्रक्टर विक्रीत एकूण 70 टक्के इतकी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2020 म्हणजे कंपनीने 23 हजार 503 इतक्मया ट्रक्टर्सची विक्री केली आहे. याच तुलनेत ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने 13 हजार 871 ट्रक्टर्सची विक्री केली होती. महिन्या महिन्याच्या मागणीचा विचार करता जवळपास 36 टक्क्मयांची वाढ दिसून आली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.









