वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनची निर्यात ऑगस्टमध्ये वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे आयातीमध्ये मात्र घसरण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडताना पहावयास मिळत आहे.
सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये चीनची निर्यात मागील वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेत 9.5 टक्क्यांनी वाढून 235.2 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. जुलैमध्ये चीनची निर्यात 7.2 टक्क्मयांनी वाढली आहे. यामुळे समीक्षकांच्या माहितीनुसार चीनची आयात मागील वर्षाच्या समान काळाच्या तुलनेत 2.1 टक्क्मयांनी घटून 176.3 अब्ज डॉलरवर राहिली आहे. जुलैमध्येही चीनची आयात 1.4 टक्क्यांनी घटली होती. अन्य देशांच्या तुलनेत चीनची अर्थव्यवस्था लवकर खुली करण्यात आली असून याचा लाभ देशाच्या निर्यात क्षेत्राला झाला.









