कडाक्याच्या उन्हासह, बोचरी हवा,श्रावण सरताना वातावरणात बदल,दमट हवामानामुळे डासांचा प्रादुर्भाव,ताप, सर्दी डोकेदुखी रूग्णांमध्ये वाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎात महापुरानंतर हवामान बदलांमुळे उष्म्यात वाढ झाली आहे. रणरणत्या उन्हासह बोचऱया हवेमुळे ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हिटचा अनुभव जनता घेत आहे. श्रावण सरताना हवामानातील बदलांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून सर्दी, ताप, डोकेदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ऑगस्टमधील ऑक्टोबर हिटने चिमुकल्यांसह ज्येष्ठांच्या आरोग्याला धक्का दिला आहे.
जुलैमधील अतिवृष्टी, महापुराने जनजीवन ठप्प झाले. नंतर दमट हवामानामुळे सामान्य सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण वाढले. `व्हायरल इन्फेक्शन’ अद्यापी सुरूच आहे. दमट हवामान डासांच्या वाढीस कारणीभूत ठरल्याने त्यांची उत्पत्ती वाढली आहे. महापुरानंतर दलदल, कचऱयांमुळे ही स्थिती निर्माण झाली. पार्किंगमधील पुराचे पाणी निघाले, पण दमटपणा कायम आहे. हेच चित्र डासांच्या वाढीस कारणीभुत ठरले आहे. डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुणीया रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये अधिकतर रूग्ण उपचार घेत असल्याने त्याची अधिकृत आकडेवारी समजून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हÎात कोरोना टेस्टींग वाढल्याने नवी रूग्णसंख्या तीनशेच्याखाली आली. सक्रीय रूग्णसंख्या दीड हजारांइतकी आहे. होम क्वांरटाईन रूग्ण पाचशेच्या आत आहे. कोरोना रिकव्हरी 97 टक्क्यांइतकी आहे. दुसरी लाट ओसरत असताना तिसऱया लाटेची शक्यता वाढली आहे. कोरोना कमी होताच कोरोना नियमावलीकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्ष झाले आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे. लसीकरणामुळे हार्ड इम्युनिटीकडे जिल्हÎाची वाटचाल सुरू आहे. अन् याच काळात रणरणत्या उन्हाचा अनुभव नागरीक घेत आहेत. ऑगस्टमधील ही `ऑक्टोबर हिट’ आरोग्याचा आलेख बिघडण्यास कारणीभूत ठरली आहे.
जिल्हÎात सप्ताहभरात सर्दी, सामान्य तापाच्या रूग्णांत वाढ झाली आहे. कोरडा खोकला असलेले रूग्णही वाढत आहेत.
याशिवाय उन्हामुळे तीव्र डोकेदुखीचा त्रास अनेकांना सुरू आहे. ताप शंभरांवर असल्याने तातडीने निदानाचा सल्ला फॅमिली डॉक्टरांकडून दिला जात आहे. उन्हात फिरताना टोपी, गॉगल्सचा वापर करा, असे आवाहन केले जात आहे. ऑगस्टमधील ऑक्टोबर हिटने आरोग्यावरील खर्चात वाढ झाली आहे. वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडले आहे. त्यातूनच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ऑगस्टमधील ऑक्टोबर हीट आरोग्यासाठी घातक
ऑगस्टच्या अखेरच्या सप्ताहात कडाक्याचे ऊन आहे. पहाटे, रात्री बोचरी हवा आहे. उन्हात फिरल्याने वातावरणातील धुळीमुळे संसर्ग वाढत आहे. त्यातून डोकेदुखी, डोळेदुखी, सर्दी, तापाची लक्षणे असलेले रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे सर्दी, ताप अंगावर न काढण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.