ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑगस्ट महिन्यापासून देशातील लहान मुलांचेही लसीकरण सुरू होऊ शकते. तसेच, अधिकाधिक कंपन्यांना लस उत्पादनाचे परवाने मिळणार असल्याने भारत लवकरच सर्वात मोठा लस उत्पादक देश ठरणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले.
मांडविया म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुढील महिन्यात देशात लहान मुलांसाठी लस उपलब्ध होऊ शकते.









