व्हॅक्सिन टास्क फोर्स प्रमुखाचा दावा
वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना विषाणूच्या खात्म्यावरून ब्रिटनमधून लवकरच चांगले वृत्त मिळू शकते. ऑगस्टपर्यंत ब्रिटनमध्ये कुठलाही नवा विषाणू फैलावणे बंद होणार असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. ब्रिटनचे सरकार सध्या कोविड-19 लसीच्या बूस्टर शॉटचा शोध घेत आहे. हा शॉट यंदा सर्वाधिक जोखीम असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे. देशाला (बी.1.1.67) व्हेरियंटने मोठय़ा प्रमाणावर प्रभावित केले होते.
ऑगस्टपर्यंत ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू फैलावणे थांवणार असल्याचा दावा ब्रिटनच्या व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख क्लीव डिक्स यांनी केला आहे. ऑगस्टमध्ये ब्रिटनमध्ये कुठलाही फैलावणारा विषाणू नसेल. व्हॅक्सिन बूस्टर प्रोग्राम 2020 च्या प्रारंभापर्यंत टाळला जाऊ शकतो अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
जुलैच्या अखेरपर्यंत ब्रिटनमधील सर्व लोकांना लसीचा किमान एक डोस मिळालेला असणार आहे. तोपर्यंत आम्ही सर्व ज्ञात व्हेरियंट्सपासून लोकांना सुरक्षित करू असे उद्गार त्यांनी काढले आहेत. लसीचा पहिला डोस देण्याच्या वेगाप्रकरणी ब्रिटन दुसऱया क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.









