प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयाच्या ठिकाणी अद्ययावत ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून यासाठी 72 लाख रुपयांची तरतूद केली आहे. ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी प्लांटची पाहणी केली. या प्लांटमुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तसेच सद्यस्थितीत कोविड रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. यावेळी आमदार नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी शाम पाटील यांच्याशी चर्चा करीत कोविड रुग्णांचा आढावा घेतला. आवश्यक सूचना यावेळी त्यांनी केल्या. या प्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी उपस्थित होते.









