शरद पाटील यांचे मत : जायंट्स मेनतर्फे मार्कंडेयनगर येथे वृक्षारोपण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे जनतेला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्राणवायू तयार करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असून जायंट्सच्या माध्यमातून हे सुरू असलेले कार्य अनुकरणीय आहे, असे विचार दुग्ध व्यावसायिक शरद पाटील यांनी काढले.
यावषी जायंट्स मेनच्यावतीने मार्कंडेयनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष संजय पाटील यांनी सातत्याने आम्ही रोप लागवड करत असून आंबा, जांभुळ आणि फणसाची रोपे जायंट्सच्या नर्सरीमध्ये तयार करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी मार्कंडेयनगर येथील प्रति÷ित नागरिक अशोक पाटील, व्यापारी सुरेश जाधव, मदन बामणे, जायंट्स नर्सरीचे सुनील मुतगेकर, सचिव विजय बनसूर, खजिनदार लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन सत्तीगेरी, आनंद कुलकर्णी, नारायण किटवाडकर, दुर्गप्रसाद जोशी, अक्षय जाधव, अभय जाधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.









