ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 25 रुग्णांचा मागील 24 तासात दुर्देवी मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून आज सकाळी यासंदर्भात माहिती देण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इतर राज्यांप्रमाणेच दिल्लीतही ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीतील 675 बेड असलेले खासगी रुग्णालय आहे. दिल्लीतील अन्य रुग्णालयांप्रमाणेच या रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मागील 24 तासात 25 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, या रुग्णालयात पुढील दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक असून, ऑक्सिजनवर असणाऱ्या 60 हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे.









