युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड आणि ऍस्ट्राझेनेका यांची प्रयोगात्मक लस क्लीनिकल ट्रायल्सच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या टप्प्यात पोहोचलेली जगातील ही पहिलीच लस आहे.19 लस आता 10,260 जणांना दिली जाणार आहे. या लसीची चाचणी ब्रिटनसह दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये होत आहे. सीरम इन्स्टीटय़ूटने भारतासाठी व्यापक प्रमाणात लस निर्मिती करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्स गुंतविले आहेत. ही लस ण्प्Adध्x1 विषाणूने विकसित करण्यात आली असून हा सामान्य सर्दीस कारणीभूत ठरणाऱया विषाणूचे कमकुवत स्वरुप आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास वर्षाच्या अखेरपर्यंत लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

चीनची लस दुसऱया टप्प्यात
बीजिंग इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिकल इंक यांनी मिळून विकसित केलेली लस इव्हॅल्युएशनच्या दुसऱया टप्प्यात आहे. तर लस पहिल्या नियामकीय टप्प्यात आहे. ही लस नॉन-रेप्लिकेटिंक व्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्मवर काम करते.
मॉडर्नाची लस दुसऱया टप्प्यात

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेज आणि मॉडर्ना कंपनीची लसही चाचणीच्या दुसऱया टप्प्यात आहे. याचा नियामकीय दर्जा पहिल्या टप्प्यात आहे. ही लस एलएनपीएनकॅप्सुलेटेड एमआरएनवर आधारित आहे.
वुहानमध्येही लसनिर्मिती

चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना विषाणू जगभरात फैलावला आहे. या वुहान शहरात देखील निष्क्रीय स्वरुपातील विषाणूचा वापर करून लस निर्मिती केली जात आहे. हा प्रकल्प सध्या 1/2 टप्प्यात पोहोचला आहे.








