लसीच्या वापरास अनुमती देणारा भारत पहिला देश ठरण्याची चिन्हे : प्रतीक्षा करणाऱयांची चिंता मिटणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गदरम्यान लसीची प्रतीक्षा करणाऱयांची चिंता पुढील आठवडय़ात मिटण्याचे संकेत बुधवारी मिळाले. भारतात लवकरच लसीच्या वापरास मंजुरी मिळण्याची शक्मयता आहे. ऑक्सफर्ड-अŸस्ट्राजेनेकाची कोरोना लस पुढील आठवडय़ात उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. भारत सरकार कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास पुढील आठवडय़ात मान्यता देणार असल्याचे समजते. ऑक्सफर्ड आणि अŸस्ट्राजेनेका यांचे संयुक्त उत्पादन असलेल्या कोविशिल्ड लसीला सरकारने मंजुरी दिल्यास भारत या लसीच्या वापरास अनुमती देणारा पहिला देश ठरणार आहे.
सिरम इन्स्टिटय़ूटने कोविशिल्ड लसीसंदर्भात सरकारला अधिक परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे. सिरमने यापूर्वीच सरकारकडे लस वापरासाठी परवानगी मागितली असली तरी लसीसंबंधी आणखी माहिती मागविण्यात आली होती. भारतात सध्या सिरम इन्स्टिटय़ूट (एसआयआय) कोविशिल्ड लस बनवित आहे. या लसीला तातडीने अनुमती मिळाल्यास कोविशिल्ड ही भारताची पहिली लस होईल. कारण भारतात अद्याप कोणत्याही लसीच्या वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही.
सिरम इन्स्टिटय़ूटचा ऍस्ट्राजेनेकाशी करार
पुणेस्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी ऍस्ट्राजेनेकासोबत ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस तयार करण्यासाठी करार केला आहे. अंतिम चाचण्यांमध्ये कोरोना लस 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अŸस्ट्राजेनेकाने केला आहे. सध्या ब्रिटनमधील औषध नियंत्रक ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या माहितीचे विश्लेषण करत आहेत.
भारतात नऊ लसी चाचणीच्या टप्प्यात
भारतात कोरोनाच्या नऊ लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. लस बनवणाऱया कंपन्यांनी लसीची आपत्कालीन वापरासाठी परवानगीही सरकारकडून मागितली आहे. भारतात लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून केली जाऊ शकते. भारतात पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. यात सगळय़ात आधी लस 50 वर्षांवरील व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱयांसह जोखीम असलेल्या क्षेत्रात काम करणाऱया लोकांना दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी नुकतेच जाहीर केले होते.









