औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रात हालचाली वाढल्या : अनलॉकचा दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रातील वाढत असणाऱया गतीमुळे वीज विक्री ऑक्टोबरमध्ये पहिल्या सप्ताहात 13.65 टक्क्मयांनी वाढ दर्शवत 25.95 अब्ज युनिटवर राहिली आहे.
मागील वर्षाच्या कालावधीत देशातील वीज विक्री 22.83 अब्ज युनिटवर होती. वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षातील संपूर्ण ऑक्टोबरमध्ये वीज विक्री ही 97.84 अब्ज युनिट राहिली होती. सांख्यिकी विधी एक्स्ट्रापोलेशनच्या आधारावर एका सप्ताहातील आकडेवारीच्या विश्लेषणानुसार माहिती नोंदवली आहे, की चालू महिन्यात वीज विक्री ही वर्षाच्या आधारे तेजीत आहे.
सदर घसरणीच्या प्रवासात फेब्रुवारीमध्ये वीज विक्री ही 11.73 टक्क्मयांनी वधारली असून चालू वर्षातील सप्टेंबरमध्ये सहा महिन्यानंतर वीज विक्री ही 5.6 टक्क्मयांनी वधारुन 113.54 अब्ज युनिटवर राहिली आहे. जी मागील वर्षात याच महिन्यात 107.51 अब्ज युनिट राहिली होती.
अनलॉकचा वीज क्षेत्रास दिलासा
लॉकडाऊनची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती, परंतु यातून सावरत मागील काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांनी आपापली नियमावली सादर केल्यानेच हा दिलासा मिळाला असल्याचे पहावयास मिळाले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गेल्या एक दोन महिन्यात उद्योगांनीही आपला कामाचा वेग वाढवला आहे.









