100 टक्के पगारासह प्रलंबित वेतनही वितरीत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दोन महिन्यापासून एस्टी कर्मचाऱयांचे वेतन रखडले होते, मात्र गणेशोत्सवाच्या आधी महामंडळाने सर्व कर्मचाऱयांचा 100 टक्के पगार वितरीत केला आहे. यापूर्वी मार्च आणि मे महिन्यातील प्रलंबित पगारही कर्मचाऱयांना देण्यात आल्याने खऱया अर्थाने कर्मचाऱयांना बाप्पा पावला असून कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. जिल्हांतर्गत काही फेऱया व सध्या गणेशोत्सवातील विशेष फेऱया वगळता अन्य वाहतुक बंदच आहे. या पाच महिन्यात एस्टीचे कोटय़वधींचे नुकसान झाल्यामुळे कर्मचाऱयांचे वेतनही रखडले होते. मार्च महिन्यात 50 टक्के तर मे महिन्यात 75 टक्के वेतन दिले गेले होते. याबाबत कर्मचाऱयांमध्ये असंतोष असतानाच प्रलंबित 75 टक्के वेतनासह जुलैपर्यंतचे 100 टक्के वेतन वितरीत करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.









