प्रतिनिधी/ बेळगाव
एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात दि. 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सिद्धराम ईटी अध्यक्षस्थानी होती. त्यांच्या हस्ते रोपे लावून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. राहुल बन्नूर, संयोजक प्रा. श्रीवास्तव मुरबाल, प्रा. शाहीन मुजावर, प्रा. आनंद बंकद, प्रा. राकेश उमदी व ग्रंथपाल इरण्णा कदगीनमठ उपस्थित होते.









