नवी दिल्ली
कृषी उपकरणे बनविणाऱया एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीचा तिसऱया तिमाहीमध्ये निव्वळ नफा 83.4 टक्क्यांनी वाढून 280.7 कोटीच्या घरात पोहोचला आहे. कंपनीला सदरचा नफा हा विविध व्यावसायिक गटामध्ये समाधानकारक विक्रीच्या जोरावर गाठता आला आहे. मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला 153.1 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. एस्कॉर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार याचदरम्यान महसूल 1,633.4 कोटीच्या तुलनेमध्ये वाढून 2,017.4 कोटी रुपयांवर राहिला आहे. सदरच्या तिमाहीत कृषी क्षेत्रात तेजी दिसली होती. तसेच टॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या मागणीत वेगाने वाढ नोंदवली गेल्याने ही मजबूत कामगिरी केली असल्याचे एस्कॉर्ट्सचे अध्यक्ष आणि संचालक निखिल नंदा यांनी सांगितले आहे.









