नवी दिल्ली
शेती आणि शेतीशी संबंधीत उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी एस्कॉर्ट्स लि. 21 नोव्हेंबरपासून आपल्या ट्रक्टर्सच्या किमती वाढविणार असल्याचे संकेत आहेत. सुट्टय़ापार्टच्या वाढत जाणाऱया किमतीवर हा निर्णय कंपनीने घेतला असल्याची माहिती आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा प्रभाग एस्कॉर्ट्स ऍग्री मशीनरी (ईएएम) 21 नोव्हेंबरपासून आपल्या किमती वाढविणार आहे. परंतु त्या किती वाढविणार त्या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
यासोबतच कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 18 नोव्हेंबर रोजी होणाऱया बैठकीत बॉण्ड, डिबेंचर आदी प्रस्तावावर चर्चा करण्याचा विचार होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.









