मुंबई
कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱया एस्कॉर्टस् ऍग्री मशिनरी यांनी कर्ज वितरणासाठी इंडसइंड बँकेसोबत सहकार्याचा करार (एमओयु)केला आहे. सदरच्या कराराअंतर्गत ग्राहकांना परवडणाऱया व्याजदराचे कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्राहकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन कर्जाची योजना आखली जाणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रांची मदत घेतली जात असून त्याकरीता कर्ज पुरवले जाणार असल्याची माहिती आहे.









