नवी दिल्ली
सिमेंट निर्मितीमधील मोठी कंपनी एसीसी लिमिटेडने आपल्या तिमाहीमधील नफा कमाईचे आकडे नुकतेच सादर केले आहेत. यामध्ये कंपनीचा निव्वळ लाभ हा 20.25 टक्क्यांनी वाढून 362.85 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचे जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष म्हणून मानले जाते. यानंतर ती आपल्या वर्षभरातील आकडेवारीचा लेखाजोखा मांडते. मागील वर्षातील समान कालावधीत कंपनीस 302.56 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. व्यापारी उलाढालीनंतर महसूल उत्पन्नात काही प्रमाणात वाढ नेंदवत 3,537.31 कोटी रुपयांवर उत्पन्न स्थिरावले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत 3,528.31 कोटींवर राहिल्याची नोंद होती. कंपनीचा एकूण खर्च 3.05 टक्क्यांनी घटून 3,042.75 कोटी आहे.









