नवी दिल्ली
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीला मार्च 2021 ला संपलेल्या तिमाहीत 532 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सदरचा नफा हा मागच्या तिमाहीएवढाच राहिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसबीआय लाइफने मागच्या तिमाहीत 531 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. जानेवारी-मार्च 2021 च्या कालावधीत एकूण उत्पन्नात लक्षणीय वाढ एसबीआय लाइफने नोंदवली आहे. एसबीआय लाइफचे उत्पन्न 20 हजार 897 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी हे उत्पन्न 5 हजार 675 कोटी रुपये इतके होते. संपूर्ण वर्षाच्या निव्वळ नफ्याचा विचार करता त्यात 2 टक्के इतकी वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये 1 हजार 422 कोटी तर 2020-21 मध्ये 1 हजार 456 कोटी निव्वळ नफा नोंदला गेला आहे. तर उत्पन्न 82 हजार 85 कोटी रुपयांचे झाले आहे, जे मागच्या वर्षात 43 हजार 843 कोटी रुपये होते.









