मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज व्याजदरात 1 एप्रिलपासून वाढ केली आहे. आता बँकेचा नवा व्याजदर 6.95 टक्के इतका असणार आहे. याआधी स्टेट बँकेचा व्याजदर 31 मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी खास ऑफर अंतर्गत 6.70 टक्के इतका आकारण्यात येत होता. सदरच्या कालावधीत हा व्याजदर 75 लाखापर्यंतच्या घरांसाठी आकारला होता. आता नवा दर 6.95 टक्के इतका असणार असून 1 एप्रिलपासून नवा दर अंमलात आला आहे. व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ झाली आहे.









