केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : अमोल कलुवेचे नाबाद शतक
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने अमृत पोतदार सीसीआयचा 7 गडय़ांनी, एसडीएमसीए ए धारवाड संघाने बीएससी ए संघाचा 141 धावानी तर युनियन जिमखाना संघाने निना स्पोर्ट्स क्लब अ चा 7 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले.
युनियन जिमखाना येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात नीना स्पोर्ट्स क्लब अ संघाने 32.3 षटकात सर्व बाद 110 धावा केल्या. लतिफ सनदीने 26, संतोष सुळगे पाटीलने 21, माजिद मकानदारने 16 तर प्रवीण सोमण्णावर व धृव नाईक यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. जिमखानातर्फे अदोक्षज एम.ने 26 धावात 5, आरिफ मलिकने 2, यश हावळाण्णाचे, वैष्णव संघमित्र, ऋषिकेश रजपूत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखानाने 17.5 षटकात 3 बाद 111 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. विनित पाटीलने 42, वैष्णव संघमित्रने नाबाद 21, ऋषिकेश रजपूतने नाबाद 14 धावा केल्या. नीनातर्फे माजीद मकानदारने 2 तर संतोष सुळगे पाटीलने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात अमृत पोतदार सीसीआयने 48.2 षटकात सर्वबाद 202 धावा केल्या. स्वयम अप्पण्णावरने 75, वैभव कुरूबागीने 44 धावा केल्या, सुमित शिरगुरकरने 22. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे यलगुरेश व्ही. बी.ने 23 धावात 3 मिलिंद रमेशने 34 धावात 3, पुनित दिक्षितने 25 धावात 3 तर विशाल राठोडने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने 38.5 षटकात 3 बाद 206 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. अमोल कलुवेने 4 षटकार व 10 चौकारासह नाबाद 101 धावा करून शतक झळकविले. त्याला मिलिंद रमेशने 58 तर पुनीत बसवाने 23 धावा करून सुरेख साथ दिली. अमृत पोतदार सीसीआयतर्फे सुमित शिरगुरकरने 2, वैभव कुरूबागीने 1 गडी बाद केला.
तिसऱया सामन्यात एसडीएमसीए धारवाड अ संघाने 49.1 षटकात सर्व बाद 300 धावा केल्या. त्यात परिक्षित उकुंडीने 89, नितीन बिलालने 70, रोशन जवळीने 39, नितीन एस. ने 35, देवीन चोप्राने 31 धावा केल्या. बीएससी ए तर्फे आकाश कटांबळेने 3, ओंकार वेर्णेकर व विजयकुमार पाटील यांनी प्रत्येकी 2 तर राकेश पाटील, वेंकटेश शिराळकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससीए संघाचा डाव 27.1 षटकात 160 धावात आटोपला. तनिष्क नाईकने 78, विजय पाटीलने 24 तर आकाश कटांबळेने 19 धावा केल्या. एसडीएमतर्फे हणमंत मांगलेने 3, ओवेस खान, शिवनगौडा पाटील, आदर्श हिरेमठ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









