विविध राजकीय पक्ष, संघटनांसह खासगी बस वाहतूक संघटनेचे पाठबळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
लढाई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है, अरे या सरकारचे करायचे काय… खाली डोकं वर पाय, एक रुपयाचा कडीपत्ता…सरकार झालंय बेपत्ता, अशा आवेशपूर्ण घोषणात एसटी कर्मचाऱयांचा संप चैथ्या दिवशीही मध्यवर्ती बसस्थानकात सुरूच होता. विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींनी संपकरी कर्मचाऱयांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे या संपाला जिह्यातील खासगी बस वाहतूक संघटनेने गुरुवारी पाठिंबा जाहीर केला असून, जिह्यातून सर्व स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला, बंदला खासगी बस वाहतूक संघटनेचा पाठिंबा आहे. राज्य शासनाने शासकीय आदेश दाखवून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संपादरम्यान खासगी वाहतूक सुरू ठेवा. एसटी आगारात खासगी बसेस लावा, अशा प्रकारचा आमच्यावर दबाव आणला होता. मात्र हा दबाव आम्ही झुगारून लावला असून, आमच्या गाडÎा एसटी डेपोत न आणण्याचा निर्णय घेतल्याचे खासगी बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक संघटनेचे विविध प्रतिनिधी, कॉम्रेड दिलीप पवार उपस्थित होते.
आमच्या घरात घुसखोरी करायची नाही
दरम्यान, सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात खासगी गाडÎांना प्रवेश देण्याच्या हालचालीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी आमच्या घरात कुणी घुसखोरी करायची नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविला होता.
संप मोडायचा नाही…
हक्काच्या लढाईला पाठिंबा देण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लक्झरी बस बसस्थानकामध्ये आत आणण्याच्याविरोधात आहे. एसटी कर्मचाऱयांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे. आम्हाला संप आम्हाला मोडायचा नाही, सतीशचंद्र कांबळे म्हणाले.
आमच्यासाठी चार दिवस घरी बसा…
कोरोना काळात तुम्ही सर्व जण घरी बसला होता. आता एसटीचा संप सुरू आहे. एसटी वाहतूक सुरू नाही. आम्हाला न्याय मिळावा, आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रवासी जनतेने आमच्यासाठी चार दिवस घरी बसावे. प्रवास शक्यतो टाळावा आणि आम्हाला सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती येथील संपकरी एसटी कर्मचाऱयांनी प्रवाशांना केली.
यांनी दिला पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करगार, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश कचरे, शहराध्यक्ष सचिन जाधव यांनी कर्मचाऱयांना पाठिंबा दर्शविला. तसेच त्र्यंबोली गोंधळी, जोशी वासुदेव जमात, फ्रेंड्स ऍपॅडमी फाऊंडेशन, भारतीय विद्यार्थी संघटना, लहुजी शक्तीसेना, छावा युवा संघटना आदि विविध संघटनांनी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलनस्थळी श्रद्धांजली
सांगली आगारातील वाहक राजेंद्र निवृत्ती पाटील यांचा गुरुवारी हद्यविकाराने मृत्यू झाला. ही बातमी समजताच संपकरी कर्मचाऱयांनी दोन मिनिटे स्तबद्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.