प्रतिनिधी /सातारा :
तब्बल सात महिन्यानंतर गुरूवारी एसटीबसची वाहतूक पुन्हा सुरू झाली. सकाळी 7 वाजल्यापासून एसटीबसच्या फेऱया सुरू झाल्या. मात्र 10 ते 15 प्रवाशांची संख्या दिसत होती. गणेशोत्सवाला सूरूवात झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढले अशी माहिती सातारा आगार व्यवस्थापक कनिष्ठ रेश्मा गाडेकर यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली होती. जिल्हाबंदी असल्यामुळे एसटीची आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. जिह्यांतर्गत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू झाली. मात्र, पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने बहुतांश बसच्या फेऱया रद्द होत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटीबसच्या वाहतूकीला परवानगी दिली. त्यानुसार शासनाच्या निकर्षाचे पालन करून ही सेवा सुरू केली आहे.
विविध मार्गावरील वाहतूक गुरूवारी पासून सुरू झाली. बस स्थानकांवर होणारी प्रवाशांच गर्दी विचारात घेऊन आवश्यकतेनुसार बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ करणे, त्यानंतर निर्जतुकीकरण करण्यात आले. सात महिन्यानंतर पुन्हा वाहक-चालक कामावर हजर झाले. यामुळे त्यांचा उत्साह चांगलाच वाढला होता. प्रवाशांची संख्या सुरूवातीला कमी असून उत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर ती वाढले. दर दोन तासांनी स्वारगेट नॉनस्टॉप, मुंबई-बोरिवली, ठाणे अशा फेरया सुरू केल्या आहेत असे गाडेकर यांनी सांगितले.









