प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाचा पादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळेच्या वेळेत एसटीच्या लाŸकडाऊन काळात बंद केलेल्या एसटीच्या बसफेऱया अजूनही सुरू न झाल्याने अनेक विद्यार्थी शाळांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. रत्नागिरी तालुक्यात पाचवी ते आठवी या वर्गांमध्ये 19 हजार 307 विद्यार्थी येणे अपेक्षित केवळ 7 हजार 625 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसांत शहरीसह ग्रामीण भागातील एसटी बसफेऱया तत्काळ सुरू करण्याच्या सूचना रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सभापती संजना माने यांनी केल्या.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती उत्तम सावंत, गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, पोकळे यांच्यासह सदस्य यांची पमुख उपस्थिती होती. सभेत रत्नागिरी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील एसटी बसफेऱया अजूनही पूर्णपणे सुरू झालेल्या नसल्याची तकार सदस्यांनी मांडली. लाŸकडाऊनमुळे गेले दीड वर्ष एसटीच्या फेऱया बंद होत्या. पण आता ग्रामीण भागासह शहरी भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र अजूनही एसटी बसच्या सर्व फेऱया त्या-त्या मार्गावर सुरू नसल्याने एसटी विभागाच्या कारभारावर सदस्यांनी बोट ठेवले.









