सावंतवाडी आगारातून 50 फेऱयांचे वेळापत्रक निश्चित
वार्ताहर / सावंतवाडी:
तब्बल तीन महिन्यानंतर लालपरी आता सोमवार 15 जूनपासून गावागावात धावणार आहे. सावंतवाडी एसटी आगारातून सुमारे 50 फेऱयांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर या बसेस गावात सोडण्यात येणार आहेत. 22 प्रवासी मास्क लावून गाडीत चढणार आहेत. तिकीट दरात कोणताही बदल नाही, असे आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी एसटी आगारातून कारिवडे, शिरशिंगे, वेर्ले, शिरोडा, आरोंदा, शिवापूर, आंबेगाव, ओरोस, कणकवली, दोडामार्ग, रेडी कनयाळ, वेंगुर्ले, कणकवली अशा बस सोडण्यात येणार आहेत.
22 प्रवासीच
लॉकडाऊन कालावधीत हे एसटीचे प्रायोगिक वेळापत्रक निश्चित केले आहे. प्रवाशांनी तोंडाला मास्क लावूनच गाडीत बसायचे आहे. फक्त 22 प्रवासीच असणार आहेत. एसटीची भाडेवाढ अद्याप झालेली नाही. पूर्वीचेच तिकीट भाडे आकारले जाणार आहे. प्रवाशांनी सोशल डिस्टन्स पाळून प्रवास करायचा आहे.
कारिवडे कालिका मंदिर सकाळी 7.30, कणकवली सकाळी 8.15, गोठवेवाडी शिरशिंगे दुपारी 1, कनयाळ सकाळी 6.30, वेंगुर्ले दुपारी 1, वेर्ले सकाळी 6.30, दोडामार्ग सकाळी 9.15, शिरोडा दुपारी 1, धोंडवाडी शिरशिंगे सकाळी 8.30, वेर्ले दुपारी 12.30, गोठवेवाडी सायंकाळी 3.30, आरोंदा कोंडुरा बाजारमार्ग दुपारी 12, कणकवली सायंकाळी 4, कणकवली सकाळी 7, वेंगुर्ले मठमार्गे सकाळी 8.30, कालिका मंदिर दुपारी 12, कणकवली दुपारी 3, शिवापूर सायंकाळी 4.30, दोडामार्ग सकाळी 11.30, आंबेगाव सकाळी 8.15, कणकवली सकाळी 11.30, ओरोस सकाळी 9 व सायंकाळी 5.15, दोडामार्ग सकाळी 7 व दुपारी 2, शिरोडा सकाळी 10.15, आंबेगाव दुपारी 1.30 वा.









