प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात आता एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिल्हय़ात सोमवारी 350 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक वाहकांची संख्या यामध्ये अगदीच नगण्य आहे. त्यामुळे वाहक चालक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी पर्यंत्न करण्यात येत आहेत़ सोमवारी देखील एसटीच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आल़ी मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच दिसून आल़े
मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासनाकडून एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात भूमिका मांडण्यात येणार होत़ी यानंतर न्यायालयाकडून घेण्यात येणाऱया भूमिकेकडे एसटी कामगारांचे लक्ष लागून राहिले होत़े दरम्यान सोमवारी मोठय़ा संख्येने एसटी कर्मचारी रत्नागिरी विभागिय कार्यालयाबाहेर एकत्र जमले होत़े मात्र संध्याकाळी उशीरा पर्यंत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचे पाहून एसटी कर्मचाऱयांच्या चेहऱयावर निराशा पसरल़ी









