विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी काढले रात्री उशीरा परिपत्रक
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या काळात सर्वच जिह्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.एसटीची वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्यादा मुंबई, बोरिवली, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.
सातारा विभागातुन सर्वच आगारातून ज्यादा बसेस व नियमित बसेस सुरु करण्याचे आदेश प्रत्येक आगाराला विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सातारा येथून मुंबई येथे जाण्यासाठी शिवशाही 6,8, 9, 10, 12, दुपारी 1, 4, तर निमआराम बस दुपारी 6, रात्री 11 वाजता, सातारा बोरिवली शिवशाही सकाळी 7 व 11 वाजता, निमआराम बस दुपारी 3 वाजता, सातारा ठाणे मार्गे बोरिवली शिवशाही सकाळी 9, दुपारी 1, सायंकाळी 5, 8, कराड आगारातून शिर्डी, मुंबई सेंट्रल, उस्मानाबाद, लातू, औरंगाबाद, मुंबई सेंट्रल, सोलापुर, कोरेगाव आगारातून परेल, हैद्राबाद, सोलापुर, फलटण आगारातून मुंबई, नाशिक, परेल, बोरिवली, मलकापूर, नगर-शिर्डी, सांगली, इचलकरंजी, कोल्हापुर, अक्कलकोट, वाई आगार, पाटण, दहीवडी, महाबळेश्वर, खंडाळा याही आगारातून बसेस सुरु करण्याचे आदेश व वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.









