प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील एसकेई सोसायटीने जनकल्याण ट्रस्टच्या जनसेवा कोविड केअर सेंटरला 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोविड-19 च्या महामारीने आपल्या सर्वांना भयावह वास्तव घडविले असून मानवी समुह मोठय़ा संकटात सापडला आहे. चारी बाजुने आढळणारे वृत्त भयभीत करत आहे. रोगाचा संसर्ग आणि क्लोजडाऊनमुळे उद्भवणाऱया हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात असलेल्या गरीबांचे दर भयंकर हाल सुरु आहेत.
अशा परिस्थितीत जनतेच्या मदतीला धाऊन जाणाऱया आरएसएस जनकल्याण ट्रस्टच्या ‘जनसेवा कोविड केअर सेंटर’ ने पुढाकार घेतला आहे. त्याचा विचार करुन सामाजिक बांधिलकी म्हणून एसकेई सोसायटीने या सेंटरला 5 लाख रुपयांची मदत केली आहे. व्यवस्थापनातर्फे ज्ञानेश कलघटगी यांनी ही माहिती दिली आहे.









