बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १९ आणि २२ जुलै रोजी एसएसएलसी परीक्षा घेण्याचे नोयोजन केले आहे. पण आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी कोरोना साथीच्या दरम्यान एसएसएलसी परीक्षा घेण्याबद्दल राज्य सरकारला फटकारले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, रविवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
रविवारी पत्रकारांशी बोलताना विश्वनाथ म्हणाले,कोरोनाच्या काळात शिक्षण विभाग आणि मंत्री एस. सुरेश कुमार यांनी परीक्षा घेण्याची काय गरज आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
कोरोना महामारी कमी झाल्यास सरकार परीक्षा घेऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी काही विशिष्ट कारणांमुळे वर्गापासून वंचित आहेत आणि परीक्षेस तयार नाहीत. विद्यार्थ्यांचा दबाव आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कुलगुरू आणि व्यावसायिकांसारख्या शिक्षणतज्ज्ञांनाही सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.









