प्रतिनिधी /बेळगाव
कृषी कॉलनी भाग्यनगर येथील सुश्री नुपूर प्रवीण प्रभू खानोलकर या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या एसएसएलसी परीक्षेत 96.32 टक्के गुण संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काकडे फौंडेशनतर्फे कौतुक करण्यात आले. कोवीड नियमावली पाळत दि. 17 रोजी पार पडलेल्या या घरगुती कार्यक्रमात संजय काकडे, उज्वला काकडे, प्रिया गोडसे, नितीन काकडे, परिमळा कुलकर्णी यांनी अभिनंदन पत्र, भेटवस्तू, चॉकलेट्स देऊन नूपूरचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. नूपूरच्या आई स्मिता प्रभू खानोलकरही यावेळी उपस्थित होत्या. अरव गोडसेनी प्रार्थना सादर केली.









