क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसआरएस स्पोर्ट्स हिंदुस्थान, डीजे बॉईज, डिंगडाँग संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. रब्बानी दफेदार, प्रशांत, मंजुनाथ शिवयोगी, सागर मक्वाना यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थान संघाने 10 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगुरेने 3 षटकार, 2 चौकारासह 41 धावा केल्या. एम. डी. स्पोर्ट्सतर्फे सुरेश शिंदेने 28 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एम. डी. स्पोर्ट्स संघाचा डाव 7.5 षटकात 39 धावात आटोपला. एसआरएसतर्फे रब्बानी दफेदारने 6 धावात 4 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात युपी बॉईजने 10 षटकात 5 बाद 91 धावा केल्या. त्यात सुलतानने 29 धावा केल्या. डीजे बॉईजतर्फे विशालने 21 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल डीजे बॉईजने 8.4 षटकात 6 बाद 93 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात दिनेशने 2 षटकार, 1 चौकारासह 23 धावा केल्या. यूपीतर्फे अन्सारने 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने 10 षटकात 6 बाद 71 धावा केल्या. त्यात प्रमोद पालेकरने 25 धावा केल्या. डिंगडाँगतर्फे मंजुनाथ शिवयोगीने 15 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल डिंगडाँगने 7.5 षटकात 3 बाद 72 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला. त्यात विनायकने 24 धावा केल्या. चौथ्या सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने 10 षटकात 5 बाद 137 धावा केल्या. त्यात सागर मक्वानाने 5 षटकार, 1 चौकारासह 10 चेंडूत 40 तर मनोज नागराळेने 16 चेंडूत 43 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चॅलेंजर बॉईज मुंबईने 10 षटकात 9 बाद 92 धावाच केल्या. त्यात गुडाने 22 धावा केल्या. एसआरएसतर्फे गौरेशने 15 धावात 4 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे गजानन फगरे, लक्ष्मण धामणेकर, उत्तम शिंदे, मल्लीकार्जुन जगजंपी, रोहित फगरे, अमर सरदेसाई, राजू राठी, अमर नाईक, गोपाळ कुंभार, शंकर गणुचे, आप्पाजी दळवी आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
गुरूवारचे सामने
बबलु स्लॅमजर्स वि. डीजे बॉईज सकाळी 9 वा., एचसीव्ही वि. इंडियन बॉईज हिंडलगा सकाळी 11 वा., मराठा स्पोर्ट्स वि. पहिल्या सामन्यातील विजेता, डिंगडाँग वि. दुसऱया सामन्यातील विजेता, दु. 3 वा.









