बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचा समावेश असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर भाष्य करण्यास नकार दिला.
माजी मंत्री जारकिहोळी यांनी एका युवतीला नोकरीचे अमिश देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जारकिहोळी यांची सेक्स व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकी आला. यांनतर जारकिहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत चौकशीची मागणी केली होती.
दरम्यान राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. त्यामुळे विशेष तपास पथक (एसआयटी) कडक कारवाई करेल. याप्रकरणाशी संबंधित लोकांना शोधून काढले आहे. बोम्माई यांनी एसआयटी स्थापन झाली आहे आणि मला याविषयी काही सांगायचे नाही. एसआयटीला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. (तपास) मी दररोज निवेदने देणार नाही, ” असे ते म्हणाले.
गृहमंत्री बोम्माई यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना भेटले आणि त्यांनी एसआयटीच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. शुक्रवारी आयपीएस अधिकारी मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीने प्रादेशिक वृत्तवाहिन्यांसह काम करणाऱ्या चार माध्यम व्यक्तींसह पाच जणांची चौकशी करण्यास सुरवात केली, असल्याची माहिती दिली.