कॅस्पर रुड, व्हेरेव्ह, जेबॉर, डिमिट्रोव्ह यांचीही आगेकूच, यानिक सिनर, जेसिका पेगुला यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
बेल्जियमची 28 वी मानांकित एलिस मर्टेन्सने शानदार प्रदर्शन करीत अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाचे आव्हान संपुष्टात आणत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. तसेच आर्यना साबालेन्कानेही प्रथमच या स्पध्sा&ची चौथी फेरी गाठली आहे. याशिवाय पुरुष एकेरीत यानिक सिनरला दुसऱ्या फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. डॅनियल अल्टमायरने त्याचा पराभव केला. तसेच ऑन्स जेबॉर, कॅस्पर रुड, अलेक्झांडर व्हेरेव्ह, ग्रिगोर डिमिट्रोव्ह यांनीही आगेकूच केली आहे.
एलिस मर्टेन्सने पेगुलाचा 6-1, 6-3 असा आरामात पराभव केला. या स्पर्धेची चौथी फेरी गाठण्याची तिची ही तिसरी वेळ आहे. पेगुलाचा पराभव करून तिने आपली क्षमता दाखवून दिली असून अव्वल खेळाडूंना ती आता आव्हान देऊ शकेल. तिची पुढील लढत अॅनास्तेशिया पोटापोव्हा व अॅनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हा यापैकी एकीशी होईल. जागतिक द्वितीय मानांकित बेलारुसच्या आर्यना साबालेन्काने या स्पर्धेच्या शेवटच्या सोळांमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळविताना रशियाच्या कॅमिला रखिमोव्हावर 6-2, 6-2 असा विजय मिळविला. साबालेन्काने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमविलेला नाही. कारकिर्दीत पहिल्यांदाच तिने या स्पध्sा&ची चौथी फेरी गाठली आहे.
जेबॉर तिसऱ्या फेरीत
ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या ओशीन डोडिनचा 6-2, 6-3 असा पराभव केला. जेबॉर जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असून डोडिन 105 व्या क्रमांकावर आहे. जेबॉरची पुढील लढत सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोविचशी होईल. म्पयन स्लोअन स्टिफेन्स किंवा कझाकची युलिया पुतिनत्सेव्हा यापैकी एकीशी होईल.
सिनरला धक्का
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 79 व्या स्थानावर असणाऱ्या डॅनियल अल्टमायरने दुसऱ्या फेरीत यानिक सिनरला पाच सेट्सच्या झुंजार लढतीत पराभवाचा धक्का देताना 6-7 (0-7), 7-6 (9-7), 1-6, 7-6 (7-4), 7-5 असा विजय मिळविला. त्याची तिसऱ्या फेरीची लढत 28 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हशी होईल. डिमिट्रोव्हने एमिल रुसुव्होरीवर 7-6 (7-4), 6-3, 6-4 अशी मात केली. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित कॅस्पर रुडने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या जियुलिओ झेपेयरीचे कडवे आव्हान परतवून लावताना 6-3, 6-2, 4-6, 7-5 असा विजय मिळविला. तिसऱ्या फेरीत त्याची लढत चीनच्या झँग झिझेन किंवा अर्जेन्टिनाचा पात्रता फेरीतून आलेला थिएगो ऑगस्टिन टायरेन्ट यापैकी एकाशी होईल.
पुरुष एकेरीच्या अन्य एका लढतीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने स्लोव्हाकियाच्या अॅलेक्स मॉल्कनचा 6-4, 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करीत तिसरी फेरी गाठली.