अनुभवी विजय कुंभार यांना मिळणार संधी?अधिकायांचे लॉबिंग
प्रतिनिधी/ सातारा
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली. यामुळे त्याठिकाणी येण्यासाठी पोलीस अधिकायांची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, यापूर्वी सांगली, सोलापूर व सातारा एलसीबीच्या कामकाजाचा व गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असणारे पोलीस निरीक्षक विजय कुंभार हेच प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
तर दुसरीकडे कराड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. बी.आर. पाटील, कराड तालुक्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, गडचिरोलीवरून नव्याने येत असलेले बाळासाहेब भरणे या अधिकायांची नावे चर्चेत आहेत. तर काही अधिकायांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, कामाचा अनुभव, गुन्हे डिटेक्शनची पध्दत या सगळ्यांचा विचार करून पोनि. विजय कुंभार यांची वर्णी लागणे अपेक्षित आहे.
पो.नि. सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीणवरून एक वर्षापूर्वी सातारा एलसीबीला बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे अन् तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांच्यात चांगले बॉंडींग बनले होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाल जिह्याच्या स्मरणात राहील असा आहे.
एक वर्षात खून, दरोडा सारख्या अनेक क्लिष्ट गुह्यांची उकल करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, त्यांनी सोलापूर ग्रामीणसाठी विनंती बदलीला अर्ज केल्याने त्यांची शुक्रवारी बदली झाली. दरम्यान, सातारा एलसीबीची जागा रिक्त झाल्याने आता येथे कोणाची वर्णी लागणार याकडे जिह्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्याकडे एलसीबीचा चार्ज होता. वाका देखील तेच एलसीबी साठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.








