ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज 15 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत 14 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपयांवर गेली आहे. मुंबईतही हा सिलेंडर 899.50 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 926 तर चेन्नईमध्ये हा सिलेंडर 915.50 रुपयांना मिळणार आहे.
यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. मागील वर्षभरात दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 305.50 रुपयांची वाढ झाली आहे. तर शासनाने आता अनुदानही बंद केले आहे.









