नवी दिल्ली
एलएमएल इलेक्ट्रिक यांनी इलेक्ट्रिक वाहननिर्मितीसाठी सइरा इलेक्ट्रिक ऑटो यांच्यासोबत भागीदारीचा निर्णय घेतला आहे. धोरणात्मक भागीदारीअंतर्गत हरयाणातील बावळ येथे सईराच्या निर्मिती कारखान्यात सदरच्या नव्या इलेक्ट्रिक एलएमएल दुचाकींचे उत्पादन घेतले जाणार आहे. 2 लाख 17 हजार 800 चौरस फूट क्षेत्रफळातील कारखान्यात महिन्याला 18 हजार वाहनांचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे एलएमएल कंपनीने स्पष्ट केले आहे.









