मिरकरवाडा बंदरातील एका घटनेची नोंद, दुसरीवर पडदा?
प्रतिनिधी/ रत्नागिरी
नजीकच्या मिरकरवाडा बंदरात एलईडी नौकेवरील खलाशाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची कुजबुज मच्छीमारांमध्ये सुरू आहे. हे खलाशी परप्रांतिय असल्याने याची कोठेही कानोकान खबर नसल्याचेही बोलले जात आहे. संबंधितांनी सर्व ‘मॅनेज’ करून या प्रकरणावर पडदा टाकल्याने पोलिसात तशी नोंद नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. तर दुसऱया घटनेत मिरकरवाडा येथे बोटीवर काम करत असताना खलाशाचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
एका 25 मेगावॅटचा जनरेटर असलेल्या एलईडी नौकेवरील खलाशी जेवण करत असताना अचानक त्याचा हात वीजवाहिनाला लागल्याने नौकेवरच त्याचा मृत्यू झाला. मात्र अनधिकृत असलेल्या या एलईडी नौकेवरील खलाशी मृत झाल्याने त्याची जबाबदारी नौकामालकावर येणार. त्यामुळेच गुपचूपपणे या प्रकरणावर पडदा घालण्यात आल्याची चर्चा मिरकरवाडय़ासह जेटी परिसर तसेच मच्छीमारांमध्ये सुरू आहे. असे असताना संबंधित यंत्रणा हातावर हात घेऊन असल्याने यात कोठे मॅनेजमेटचा विषय झाला नाही ना, अशीही शंका मच्छीमारांमधून उपस्थित केली जात आहे.
मिरकरवाडय़ात बोटीवर खलाशाचा अपघाती मृत्यू
शहरातील मिरकरवाडा येथे बोटीवर काम करत असताना खलाशाचा अपघाती मृत्यू झाल़ा ही घटना शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडल़ी मितलाल गंगाराम चौधरी (34, ऱा कैलाली नेपाळ सध्या मिरकरवाडा) असे मृताचे नाव आह़े रत्नागिरी शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मितलाल हा असगर पावसकर (ऱा पावस रत्नागिरी) यांच्या बोटीवर कामाला होत़ा शनिवारी सायंकाळी बोटीवर काम करत असताना बोटीवरील दोर तुटल्याने मितलाल हा पाण्यात पडल़ा मितलाल याला सहकाऱयांनी तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केल़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.









