वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडून गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. सध्या 6.9 टक्क्मयांनी वार्षिक क्याजदराने कर्ज ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार सिबल स्कोर 700 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्यावरील व्याजदरावर कर्ज उपलब्धी होणार आहे.
याअगोदर गृहकर्जावरील व्याजदर 7.50 टक्के इतका होता. परंतु सध्याच्या घडीला करण्यात आलेली व्याजदर कपात ही सर्वाधिक कमी असल्याचे स्पष्टीकरण एलआयसी हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले आहे.
ग्राहकांचा सिबल स्कोर 700 असला तरीही त्या ग्राहकांना 50 लाखापर्यंतचे गृहकर्ज उलपब्ध करुन देण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे म्हटले आहे. एप्रिलमध्येही व्याजदर कपात करण्यात आला होता. यामुळे आतापर्यंत कंपनीने व्याजदरात 8.1 टक्क्मयांनी घटून 7.5 टक्के वार्षिक पातळीवर केला आहे.









