मुंबई
मार्च 2022 ला संपणाऱया चालू आर्थिक वर्षात भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा आयपीओ सादर होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. सरकारने नुकतेच याबाबतीत स्पष्टीकरण दिले असून पुढील आर्थिक वर्षात आयपीओ सादरीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीओसंदर्भात मूल्यांकनासह इतर सर्व कामे होण्यासाठी फार काळ लागत असल्याने याच आर्थिक वर्षात आयपीओ दाखल होणे कठीण असल्याचे सरकारने म्हटले आहे.









