मार्च 2021 पर्यंत आयपीओ आणण्याची तयारी :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वित्त वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी चालू वर्षाच्या अंतिम क्षणापर्यंत भारतीय जीवन विमा निगमचा (एलआयसी) आयपीओ सादर करण्यात येणार असल्याचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते. परंतु आतापर्यंत एलआयसीच्या असेट्सच्या मूल्यांकनासाठी कोणालाही नियुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे आयपीओ येण्यास वेळ लागणार आहे.
एलआयसीचा बहुप्रतीक्षित आयपीओ नियोजित कालावधीत सादर होणार नसल्याचे समजते. कारण कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनासह अन्य बाबींचे नियोजन न केल्यामुळे सदरचा आयपीओ चालू वर्षाच्या मार्च 2021 पर्यंत तरी काही येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सदरहू कामासाठी 6 ते 8 महिने लागणार असल्याचे सांगण्यात येते. चालू वित्त वर्षाच्या अंतिम दिवसापर्यंत आयपीओ येणे थोडे कठीणच असल्याचे स्पष्ट केले आहे.
आयपीओ म्हणजे?
जेव्हा कोणतीही कंपनी शेअर बाजारामध्ये पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांच्या समोर काही समभाग विकण्याचा प्रस्ताव ठेवते तेव्हा या प्रक्रियेला सर्वाजनिक सादरीकरण किंवा आयपीओ असेही म्हटले जाते. म्हणजे एलआयसीच्या आयपीओला सरकार सर्वसामान्य लोकांसाठी बाजारात आणणार आहे. यानंतर लोक एलआयसीची समभागाच्या आधारे हिस्सेदारी खरेदी करण्याचे संकेत आहेत.









