मुंबई
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने आपल्या आयपीओच्या सादरीकरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यास सुरूवात केली आहे. याच महिन्यात आयपीओसाठीची लागणारी कागदपत्रे एलआयसी बाजारातील नियामक सेबीकडे सादर करू शकते. आयपीओमध्ये सामील होणाऱया आपल्या पॉलिसीधारकांना एलआयसीने पॅन अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. एलआयसी यासंदर्भात जाहिरातीद्वारेही पॉलिसीधारकांना माहिती पोहचवत असल्याची माहिती देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ सादर होणार आहे. म्हणजेच हा आयपीओ मार्चपर्यंत लाँच होण्याची चिन्हे आहेत. एलआयसी आयपीओमार्फत 1 लाख कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत.









