प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या दोन लाख, 68 हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एरंडोली अपहार प्रकरणी दोषी आहेत. चौकशी समितीने तसा अहवालही दिला आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याऐवजी एकाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सर्वच कर्मचारी दोषी असल्याने सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.








