वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारकडून मागील काही दिवसांपासून प्रलंबित असणाऱया डेप्युटी गव्हर्नर पदावर अखेर एम.राजेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या नियुक्ती संदर्भात मंत्रिमंडळाने एम.राजेश्वर राव यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांनी कार्यकाळ समाप्त होण्याअगोदरच तीन महिने आधी आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला होता.
36 वर्षांचा दीर्घ अनुभव
भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 नुसार केंद्रीय बँकेमध्ये चार डेप्युटी गव्हर्नर कार्यरत असतात. राव यांनी 36 वर्षापर्यंत आरबीआयमध्ये विविध पदांवर आपली सेवा बजवलेली आहे. यामध्ये कर्ज प्रबंधन, फायनान्शिअल मार्केट्स ऑपरेशन अशा विभागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळलीय.









