मालवण : प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोविंद उर्फ बंटी केरकर ( मालवण ), दिनेश कुबडे ( सावंतवाडी ), वल्लभ घोटगे (दोडामार्ग ), मनोज कुडाळकर ( कुडाळ ) या चार पंचांनी यश संपादन केले. हे चारही जण पुणे येथे होणाऱ्या व्हिवा, व्हिडिओ, प्रेझेंटेशन परीक्षेसाठी सिंधुदुर्गातुन पात्र झाले आहेत. २५ आणि २६ आॕगस्ट रोजी ही परीक्षा होणार आहे.









