मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ११ एप्रिल रोजी होणार एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. त्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि अधिकारी यांच्याबरोबर व्हिसीमार्फत बैठक होणार आहे.
दरम्यान ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज ठाकरे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच खासदार नवनीत राणा यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.