मुंबई –
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपर्यंत कोणतेही अधिकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱया अधिकाऱयांना पुन्हा याच पदावर नियुक्त करण्यासाठी कमीत कमी तीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी तीन वर्षांसाठी अंतर आहे, कारण यामध्ये ते बँकेचे अधिकारी न राहता, बँकेच्या किंवा अन्य कोणत्याही कंपनीसोबत कार्यरत न राहता त्यांना वेगळे राहावे लागणार असल्याचा नियम राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
एमडी आणि सीईओ म्हणून जे बँकेचे प्रमोटर्स आहेत, किंवा त्यांच्याकडे अधिकची हिस्सेदारी आहे, तेच 12 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत या पदावर राहू शकणार नाहीत. हा बदल आरबीयला वाटल्यास ते 15 वर्षांसाठी आपली इच्छा असल्यास बदलू शकतात, असेही आपल्या आदेशात आरबीआयने म्हटले आहे.









