नवी दिल्ली
इलेक्ट्रीक वाहनांकरीता लागणाऱया चार्जरच्या निर्मितीकरीता एमजी मोटर इंडिया व टाटा पॉवर एकत्र येणार आहेत. इंधनाचा वापर कमीत व्हावा व प्रदुषण दूर सारण्यास मदत व्हावी याकरीता भविष्यात इलेक्ट्रीक वाहन वापरण्याचा पर्याय अवलंबण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. हे पाहूनच आता दुचाकी आणि चारचाकी वाहने इलेक्ट्रीकआधारीत तयार केली जात आहेत. याला अनुषंगून एमजी मोटर व टाटा पॉवर या दोन्ही कंपन्यांकडून सर्वाधिक वेगवान चार्जर तयार केले जाणार आहेत. टाटा पॉवर वेगवान चार्जिंगची सुविधा एमजी मोटरच्या निवडक विक्री केंद्रावर प्रारंभी उपलब्ध करणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने इतरत्र सुविधेचा विस्तार केला जाणार आहे. 50 केडब्ल्यू डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन सुरु केले जाईल.









