वृत्तसंस्था/ गुरुग्राम
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगासह भारतात वर्क फ्रॉर्म होम ही संकल्पना वेगाने समोर आली आहे. यामध्ये अधिक अधिक कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबिण्यावर भर देण्यात येत आहे. आयटी कंपन्यासह अन्य महत्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे. गुरुग्रामधील एमएनसीएस, आयटी, बीपीओ या मोठय़ा कंपन्यांमधील कर्मचाऱयांना येत्या जुलैपर्यंत याच पद्धतीने काम करावयास सांगितले असल्याचे हरियाणा सरकारमधील एका वरि÷ अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
किरकोळ व्यवसाला दिलासा
देशातील लॉकडाऊनचे दुसरे सत्र सुरु असून ते 3 मे पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे देशात विविध विभागांमध्ये तीन टप्पे केले आहेत. त्यात रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन अशा प्ररकारचा समावेश करण्यात आला असून संबंधीत व्यवसायांना त्या आधारे सवलत मिळणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.









