वृत्तसंस्था/ मुंबई
शाओमी कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन एमआय 11 अल्ट्रा स्मार्टफोन भारतीयांसाठी 7 जुलैपासून विक्रीला उपलब्ध होणार असल्याचे समजते.
सदरचा स्मार्टफोन 2 महिन्यापूर्वी लाँच केला गेला होता. पण त्यानंतर मात्र सदरचा फोन भारतात विक्रीला उपलब्ध नव्हता. अखेर 7 जुलैपासून हा फोन दुपारी 12नंतर विक्रीला उपलब्ध केला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक अशी वैशिष्टय़े या फोनमध्ये असल्याने अनेकांनी या फोनची वाट पाहिली आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 888 एसओसी, मोठा कॅमेरा सेन्सर व 67 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसारख्या सुविधा असणार आहेत. सदरचा फोन हा एमआयडॉटकॉम व एमआयहोम्स यावर विक्रीकरीता उपलब्ध होणार आहे. हा फोन वनप्लस 9 प्रो व विवो एक्स 60 प्रो प्लसला टक्कर देणार आहे. 2021 मध्ये कॅमेराच्या तुलनेत विचार करता हा सर्वोत्तम स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. एमआय 11 अल्ट्रा लाँच होऊन दोन महिने झाले. पण भारतात आणता न आलेने विक्रीच्या अडचणी कंपनीला मध्यंतरी जाणवल्या होत्या.
स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डामार्फत हा फोन खरेदी करणाऱयांना 5 हजाराच्या कॅशबॅकचा फायदा होणार आहे. 12 जीबी रॅमसह 256 जीबी अंतर्गत साठा करण्याची सोय असणाऱया या फोनची किंमत 69 हजार 999 रुपये इतकी असणार आहे.









