बेंगळूर/प्रतिनिधी
मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून, कॅम्पसमध्ये आणखी १८४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या २४ तासांत उडुपी जिल्ह्यात नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी ८७ टक्क्यांहून अधिक एमआयटी मध्ये नोंदवली आहेत. त्यामुळे या झोनमध्ये अधिक खबरदारी घेतली जात आहे.
“जिल्हा कोविड -१९ नोडल अधिकारी डॉ. प्रशांत भट यांनी आतापर्यंत कॅम्पसमध्ये असलेल्या प्रत्येकाची एकदा चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कोविड -१९ प्रकरणांच्या संपर्कांचा समावेश असलेल्या टेस्टिंगची दुसरी फेरी आता सुरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
शुक्रवारी एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या ६६७ वर पोहोचली आहे. उडुपीमधील एकूण १४५ रुग्णांपैकी गुरुवारी एमआयटीत १११ नवीन प्रकरणे नोंदली गेली.