एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांची आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसवर टीका
प्रतिनिधी/ सोलापूर
काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात एमआयएमला मत म्हणजे बीजेपीला मत असे वक्तव्य केले होते. याला प्रत्युत्तर शनिवारी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी उत्तर देत म्हणाले, काँग्रेसने आपल्या पराभावाचे आत्मचिंतन करावे, दुसऱ्यावर खापर का फोडता, आम्ही बी टीम आहोत तर काँग्रेसच भाजपची ए टू झेड टीम आहे. प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध केला.
काँग्रेसचे नेते काम करत नाहीत तर उलट एमआयएम पक्षाला का दोष देता, आम्हाला बी.टीम म्हणायचे सोडून द्या, जनतेला सर्व कळते तुम्हीच भाजपचे बी टीम आहात असे म्हणत शाब्दी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षांमधील निवडून आलेले आमदार, खासदार, मंत्री, भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपचे मिशन लोटस ही पूर्ण होत आहे.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मी एमआयएम पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली तर काँग्रेसने प्रचारासाठी ज्योतिराजआदित्य शिंदे यांना आणले होते. मात्र त्यांनी आता हवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मग मला सांगा भाजपची बी टीम कोण आहे असे म्हणत शाब्दी यांनी सवाल केला.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्याच्या पगार वाढवावा
काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबर याचे पगार वाढवाव्यात. कारण हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. राजकारण करावे मात्र खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करू नये. मुस्लिम बांधवांना कुराणची शपथ देऊन त्यांना जलील करू नका, आम्हाला आता बी टीम म्हटल्यावर फरक पडत नाही. आम्ही जनतेचे काम करून निवडून येऊ असेही शाब्दी म्हणाले.
दोन्ही लॉकडाऊनमध्ये एमआयएमचे चांगले काम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन मध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाच्या वतीने वीस हजार कुटुंबांना अन्नधान्याचे किती वाटप करण्यात आले आहे. एमआयएमने जे काम केले ते कोणत्याच नेत्यांनी, पक्षानी केले नाही.यापुढे ही गरिबांसाठी काम करू असेही शाब्दी यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









